कोल्हापूरची दातृत्वाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:31+5:302021-09-02T04:54:31+5:30

कोल्हापूर : आपण दिलेल्या निधीचा विनियोग संरक्षण खात्यामध्येच चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने ...

Trying to carry forward the tradition of charity of Kolhapur | कोल्हापूरची दातृत्वाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न

कोल्हापूरची दातृत्वाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न

Next

कोल्हापूर : आपण दिलेल्या निधीचा विनियोग संरक्षण खात्यामध्येच चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे एक कोटींचा निधी सुपूर्त केला. आपण काही वेगळे केले नाही. परंतु कोल्हापूरची दातृत्वाची परंपरा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अशा भावना डॉ. प्रकाश गुणे यांनी व्यक्त केल्या.

डॉ. गुणे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी एक कोटींचा निधी संरक्षण खात्याकडे देणगी म्हणून दिला. याबद्दल कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सर्व माजी अध्यक्षांच्यावतीने त्यांचा बुधवारी विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. गुणे बोलत होते. या वेळी कलाकार विजय टिपुगडे यांनी साकारलेली कलाकृती गुणे यांना भेट म्हणून देण्यात आली.

या वेळी माजी अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे म्हणाले, डॉ. गुणे यांचा सत्कार हा घरच्याच व्यक्तींनी केलेला सत्कार आहे. कारण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद डॉ. गुणे यांनी याआधी भूषवलेले आहे. आपल्या देशाचे रक्षण करताना जखमी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी एवढी मोठी वैयक्तिकरित्या देणगी बहुदा पहिल्यांदाच देण्यात आली असावी. कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. पण लोकांचा वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास कमी न होऊ देता त्यांना दिलासा देण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू. -सचिव डॉ. उद्धव पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शतक महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी डॉ. हणमंत पाटील, डॉ. अजित चांदेलकर, डॉ. बी.जी जाधव-डेकरे उपस्थित होते.

०१०९२०२१ कोल प्रकाश गुणे

कोल्हापुरात बुधवारी संरक्षण खात्याला एक कोटींची देणगी दिल्याबद्दल मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षांच्यावतीने डॉ. प्रकाश गुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून डॉ. संदीप साळोखे, डॉ. बी. जी. जाधव डेकरे, डॉ. उद्धव पाटील, डॉ. अजित चांदेलकर, डॉ. हणमंत पाटील उपस्थित होते.

Web Title: Trying to carry forward the tradition of charity of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.