विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:00 AM2017-12-18T01:00:50+5:302017-12-18T01:02:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.
जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचाच वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दि. ४ मे १९४० रोजी पहिल्या विमानाचे टेक आॅफ केले. पहिल्या विमानातून शाहूपुरीतील रहिवासी उद्योजक शिवलाल ब्रदर्स यांनी प्रवास केला. ‘बॉम्बे टू कोल्हापूर’ या पहिल्या विमानातून पत्रव्यवहारही करण्यात आला. नवीन विमानसेवा सुरू झाल्यास त्यातून टपाल पाठविणे आणि त्यावर ‘फर्स्ट फ्लाईट’ असा उल्लेख करण्याची पद्धत होती. विकासाची दूरदृष्टी असल्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळे मिळाली. खºया अर्थाने कोल्हापूर ग्लोबल झाले. या विमानसेवेमुळे जिल्ह्णाचा विकास सुरू झाला. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. ती आता लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सरकार कृतज्ञता व्यक्त करीलच
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देऊन सरकार त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीलच. यासाठी राज्य सरकारच्या वतीने लागणारी प्रशासकीय मंजुरीची प्रक्रियाही लवकरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.