‘वटमुखत्यार’पत्राने जमीन विकण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2015 11:39 PM2015-09-23T23:39:35+5:302015-09-24T00:04:08+5:30

बेकायदेशीर व्यवहार : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, ‘धर्मादाय’ची परवानगी नाही--‘इंचनाळ गणपती’च्या जमिनीची कुळकथा

Trying to sell land with 'Watermelon' letter! | ‘वटमुखत्यार’पत्राने जमीन विकण्याचा प्रयत्न !

‘वटमुखत्यार’पत्राने जमीन विकण्याचा प्रयत्न !

googlenewsNext

राम मगदूम -गडहिंग्लज --‘इंचनाळ’ गावच्या सात-बारा पत्रकी ‘श्री गणपती देवा’ची मालकी असणारी देवस्थानची शेतजमीन केवळ वटमुखत्यारपत्राच्या आधारेच मूळ वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी व त्यांच्या वारसांना अंधारात ठेवून आपल्या प्रापंचिक कारणासाठी विकण्याचा प्रयत्न मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगे या वटमुखत्याराने केला आहे. त्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि धर्मादाय आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. यामुळेच जमीन खरेदी-विक्रीचा हा व्यवहार बेकायदेशीर ठरला आहे.पूर्वीपासूनच सात-बारा आणि ८-अ पत्रकी मालक कोष्टकी ‘श्री गणपती देव’ अशी नोंद आहे. मात्र, या जमिनीचे वहिवाटदार असणाऱ्या श्री गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपले भाऊ मनोहर यांना ५० वर्षांपूर्वी एक वटमुखत्यारपत्र करून दिले होते. त्या आधारेच ही जमीन खरेदी-विक्रीचा प्रयत्न झाला आहे. पूजा-अर्चा आणि देखभालीची जबाबदारी पार न पाडताच देवाची जमीन विकण्याचा व हडपण्याचा प्रयत्न झाल्यामुळेच ग्रामस्थ व गणेशभक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
२७ नोव्हेंबर १९५९ रोजी गजानन बाळकृष्ण जोशी यांच्याकडून मिळालेल्या वटमुखत्यारपत्राच्या आधारेच मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगेनी आनंदराव धोंडिबा पोवार यांना देवस्थानची सहा एकर २९ गुंठे इतकी जमीन केवळ १६ लाखांस खरेदी देण्याचे करारपत्र स्टँम्पवर करून दिले आणि संचकारापोटी दहा लाख रूपये घेतले आहेत. १० आॅक्टोबर २००३ रोजीच मनोहर यांनी संचकाराचा हा करार आनंदराव पोवार यांना करून दिला. तथापि, या करारापूर्वीच अनिलकुमार राजाराम दड्डीकर (रा.गडहिंग्लज ) व बाळकू भीमा पोवार (रा. इंचनाळ) या दोघांनाही काही रकमेच्या व्याजात भोगवट्यासाठी सदरची जमीन दिली होती. दड्डीकर यांची मुदत २०१० च्या चैत्र पाडव्यापर्यंत, तर बाळकू पोवारांची मुदत २४ जुलै २०१६ पर्यंत असल्याचेही त्याच संचकारपत्रात नमूद आहे.
दरम्यान, ११ डिसेंबर २००९ रोजी १०० रूपयाच्या स्टँम्पवरील पुरवणी करारपत्र व ताबा पावतीनुसार मनोहर जोशी-दंडगे यांनी आनंदराव पोवार यांच्याकडून दोन लाख ८५ हजार धनादेशाने स्वीकारून दड्डीकर यांचे मयत वारस सुनीता दड्डीकर यांना अदा केली. आणि त्या जमिनीचा कब्जा आनंदराव पोवार यांच्या ताब्यात दिला आहे. संचकारपत्र आणि पुरवणी करारपत्रावरूनच ‘देवा’ची ही शेतजमीन आनंदराव पोवार यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

जमिनीचा मालक गणपती देवच !
इंचनाळ गावच्या सात-बारा व ८ अ उताऱ्यावर मालक कोष्टकी श्री गणपती देवाची नोंद असून गजानन बाळकृष्ण जोशी हे वहिवाटदार आहेत.
२७ नोव्हेंबर १९५९ रोजी गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपला भाऊ मनोहर यांना या जमिनीसंदर्भातील वटमुखत्यारपत्र करून दिले. त्या वटमुखत्यारपत्राच्या आधारेच त्यांनी ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला आहे.
१० आॅक्टोबर २००३ रोजी मनोहर जोशी-दंडगे यांनी प्रापंचिक कारणासाठी आनंदराव पोवार यांना ही जमीन करारपत्राने १६ लाखाला खरेदी दिली व संचकारापोटी दहा लाख रूपये स्वीकारले.
११ डिसेंबर २००९ रोजीच्या पुरवणी करारपत्र व ताबा पावतीनुसार मनोहर जोशी यांनी पोवार यांच्याकडून दोन लाख ८५ हजार इतकी रक्कम चेकने स्वीकारली आणि दड्डीकर यांचे देणे भागवून जमिनीचा कब्जा आनंदराव पोवार यांच्या ताब्यात दिला.

Web Title: Trying to sell land with 'Watermelon' letter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.