कमला कॉलेजमध्ये तुकाराम बीज उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:54+5:302021-04-19T04:20:54+5:30
विश्वकर्मा मंदिरासाठी मदतीचे आवाहन कोल्हापूर : उजळाईवाडी येथील कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा मनुमय पंचाल समाज सेवा संस्थेच्यावतीने विश्वकर्मा मंदिराचा जीर्णोध्दार ...
विश्वकर्मा मंदिरासाठी मदतीचे आवाहन
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा मनुमय पंचाल समाज सेवा संस्थेच्यावतीने विश्वकर्मा मंदिराचा जीर्णोध्दार आणि सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी समाजबांधवांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
ईपीएस पेन्शनवाढ तत्काळ जाहीर करा
कोल्हापूर : कोरोनाचा सर्वात जास्त आर्थिक फटका खासगी सहकारी निमशासकीय क्षेत्रातून निवृत्त झालेल्या ईपीएस ९५ पेन्शनधारकांना बसला आहे. त्यामुळे ईपीएस पेन्शनवाढ तत्काळ जाहीर करावी.
या पेन्शनरांच्या विविध संघटनांकडून महागाई निर्देशांकानुसार नऊ हजार पेन्शनवाढीची मागणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक कार्यवाहीचे आदेश केंद्र शासनाला दिले आहेत. पेन्शनवाढीबाबत खासदार धैर्यशील माने यांनी हा प्रश्न संसदेच्या अधिवेशनात मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेन्शनवाढ तत्काळ जाहीर करावी, पेन्शनवाढ मागील फरकासह जमा करावी, अशी मागणी ईपीएस पेन्शनर संघटनेचे एस. एल. कुलकर्णी यांनी केली आहे.
‘अवनी’कडून बालविवाह रोखण्याबाबत जागर
कोल्हापूर : येथील अवनी संस्थेच्यावतीने बालविवाह रोखण्यासाठी शिरोळ, पन्हाळा तालुक्यातून पथदर्शी ‘जागर प्रकल्प’ सुरू केला आहे. या संस्थेने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या निधीतून या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पाद्वारे समाजप्रबोधन आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बालग्राम संरक्षण समिती, वॉर्ड बाल संरक्षण समिती गठित केली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, समन्वयक प्रमोद पाटील, इम्रान शेख, कादंबरी भोसले यांचा सहभाग असणार आहे.
प्रायव्हेट क्लासेसला परवानगी द्या
कोल्हापूर : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने कोरोनाचे नियम व अटीनुसार दहावी, बारावीचे वर्ग सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अतुल निंगुरे यांनी केली आहे.
सेट परीक्षेत सयाजीराव पाटील उत्तीर्ण
कोल्हापूर : येथील न्यू हायस्कूलचे क्रीडाशिक्षक सयाजीराव पाटील हे राज्य पात्रता चाचणी (सेट) परीक्षेत शारीरिक शिक्षण या विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या दि न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, मुख्याध्यापक के. ई. पवार, जिमखाना विभागप्रमुख एच. बी. खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (१८०४२०२१-कोल-सयाजीराव पाटील (सेट)