महाराष्ट्राचे श्रध्दास्थान श्री. तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ?, संभाजीराजे छत्रपतींनी केली चौकशीची मागणी
By विश्वास पाटील | Published: July 24, 2023 07:12 PM2023-07-24T19:12:55+5:302023-07-24T19:49:02+5:30
कोल्हापूर : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती ...
कोल्हापूर : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद करण्यात आली. यावेळी देवीचे काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समोर आले. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. तसेच गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्य पक्षाच्यावतीने मोठे आंदोलन उभा करण्याचा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.