कोल्हापूर: तुळशी धरण ९३ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 04:27 PM2022-08-11T16:27:14+5:302022-08-11T16:29:36+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ...
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९३ टक्के इतका पाणीसाठा झाला असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आले आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असेही आवाहन राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले.
धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.