तुळशी धरण चोरीला जातंय !

By admin | Published: April 25, 2016 11:37 PM2016-04-25T23:37:10+5:302016-04-26T00:42:32+5:30

अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या प्रतिक्रिया\धरण परिसरातच अतिक्रमण

Tulsi dam is stolen! | तुळशी धरण चोरीला जातंय !

तुळशी धरण चोरीला जातंय !

Next

श्रीकांत ऱ्हायकर--धामोड  --राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या ‘तुळशी’जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपल्या राजकीय पाठबळाच्या जोरावर व आधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर होणार असून भविष्यात पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे.
या पाणलोट क्षेत्राच्या जमिनीवर आपलाच हक्क असल्याच्या अविर्भावात हे धनदांडगे शेतकरी असून अशा शेतकऱ्यांना इथला अधिकारीवर्गच पाठीशी घालत असल्याच्या चर्चा काही शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या गोष्टीची वेळीच शहानिशा होऊन संबंधितावर योग्य ती कारवाई न केल्यास काही दिवसांत धरणच चोरीला जाणार यात शंका नाही व त्यामुळे धरणातील पाणीसाठाही कमी होणार आहे.
धरण उभारणीच्या अगोदरच्या काळात या परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. येथील लोकांचा हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच महाराष्ट्र्र शासनाने १९७०-७२च्या दरम्यान तुळशी नदीच्या पात्रावर ३.४७ टी.एम.सी.इतका पाणीसाठा करणाऱ्या ‘तुळशी’ जलाशयाच्या उभारणीला सुरुवात केली. अल्पावधीतच धरणाचे काम पूर्ण होऊन येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. दरम्यान, या तलावाच्या उभारणीत ज्या लोकांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना शेतीकाठावर उपलब्धते- नुसार जमीन दिली. परिणामी इथला शेतकरी सुखी झाला.
गेल्या कित्येक वर्षांपासून तलावातील या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरितक्रांती घडवून आणली. तोच शेतकरी तलावातील पाणीसाठवण क्षमतेचा विचार न करता धरण पाणलोट क्षेत्रातच अतिक्रमण करत आहे. ९८.२८ द.ल.घ. पाणी साठवण क्षमता, ३ वक्र दरवाजे, एक भुयारी दरवाजा, ३ अंतर्गत दरवाजे व ३४.९२ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र अशी वैशिष्ट्ये घेऊन उभारलेल्या या तुळशी तलावाने गेल्या ४० ते ५० वर्षांत अनेकांचे संसार फु लवले आहेत, पण असे असले तरी तलावाच्या अस्तित्वाबाबत व इथल्या समस्यांबाबत ना इथला अधिकारीवर्ग कार्यतत्पर आहे ना शेतकरीवर्ग. परिणामी येत्या काही दिवसांत धरणच चोरीला गेले, तर त्याबद्दल कुणालाच नवल वाटायला नको. आता वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी भविष्याचा विचार करून येणारी आव्हाने पेलण्यासाठी तुळशी तलावाच्या वेगवेगळया समस्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे बनले आहे, अन्यथा धरणाच्या सुरक्षिततेचा, अस्तित्वाचा, पर्यायाने पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, यात कोणतीच शंका नाही.

सपाटीकरण सुरू : धनदांडग्यांचे कृ त्य
हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा तुळशी तलाव शासनाच्या दुर्लक्षतेमुळे वनअधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.
सध्या तर या जलाशयाच्या काठावर ाहरातील धनदांडग्या व्यावसायिकांनी अत्यल्प दराने जमिनी खरेदी क रून सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.
मोहितेवाडी, पिपरेवाडी, खामकरवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने या तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात १०० ते २००
फु टापर्यंत आतमध्ये दगडी बांध घालून अतिक्रमण के ले आहे.
अशा प्रकारांना या परिसरात चांगलाच ऊत आल्याने भविष्यात पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे.

Web Title: Tulsi dam is stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.