सुळंबी येथे बोगद्यावरील दरड कालव्यात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:22+5:302021-07-16T04:18:22+5:30
पावसाचे दिवस असल्याने कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यात दरड कोसळल्याने पाण्याचा प्रवाह थांबला असून, कालव्यातील भरावा वेळेत ...
पावसाचे दिवस असल्याने कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यात दरड कोसळल्याने पाण्याचा प्रवाह थांबला असून, कालव्यातील भरावा वेळेत न काढल्यास कालवा फुटण्याचा धोका आहे. लवकरात लवकर हा भरावा संबंधित विभागाने काढावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. डाव्या कालव्याचा कि.मी. १ ते १० पर्यंतचा हा भूभाग हा विचिञ भुस्तराचा आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी कालवा फुटीचे प्रकार घडले आहेत. कालवा फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणीसाठा कमी करण्यासाठी धरणातील पाणी या कालव्यातून सोडण्यात आले आहे. तसेच पावसाचाही जोर कायम आहे. कालव्याचे अस्तरीकरण खराब झाले आहे. परिणामी पाण्याच्या प्रवाहांने कालवा फुटण्याची शक्यता आहे. कमकुवत ठिसूळ झालेली उर्वरित दरडी काढून तसेच कालव्यात पडलेला दरडीचा भराव त्वरित हाटवून कालवा नियमितपणे प्रवाहित करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
१५ सुळंबी कालवा
फोटो ओळ-
सुळंबी (ता. राधानगरी) येथे दूधगंगा डाव्या कालव्यात बोगद्याची कोसळलेली दरड. (छाया_ समर्थ पाटील)