Kolhapur: मसोलीत टस्करने मका, शेंगासह ट्रॅक्टरचे केले नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:42 PM2024-05-13T18:42:22+5:302024-05-13T18:42:56+5:30
सात महिन्यांनी पुन्हा चाळोबा गणेश हत्ती दाखल
सदाशिव मोरे
आजरा : सात महिन्यानंतर चाळोबा गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर पुन्हा आजरा तालुक्यात दाखल झाला आहे. दोन दिवस टस्करने मसोली येथील चंद्रकांत गुरव यांचे मका व उन्हाळी काढलेल्या शेंगा विस्कटून नुकसान केले आहे. तर सोमनाथ तेजम यांच्या ट्रॅक्टरचे नुकसान केले. तालुक्यात टस्कर पुन्हा दाखल झाल्याने भितीचे वातावरण पसरले.
टस्कर गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, अर्जुनवाडी व आजरा तालुक्यातील चितळे, भावेवाडी, खानापूर रायवाडा या ठिकाणी सात महिने होता. दोन दिवसांपूर्वी मसोली परिसरात दाखल झाला आहे. चंद्रकांत गुरव यांनी उन्हाळी काढलेल्या शेंगा शेतात खाऊन विस्कटल्या तर दहा गुंठे क्षेत्रातील मक्याचेही नुकसान केले. सोमनाथ तेजम यांचा ट्रॉलीसह उभा असलेल्या ट्रॅक्टरला जोराने धडकून उलटा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रॅक्टरचे हूड व सायलेन्सरचे नुकसान झाले. वनपाल बी. आर. निकम, वनरक्षक प्रियांका पाटील, वनसेवक रमेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दिवसभर टस्कर चाळोबा जंगलात आहे.