बारावीच्या गुणपत्रिका उद्या मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:46+5:302021-08-20T04:27:46+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. २१) दुपारी तीन वाजता त्यांच्या महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत. बारावीच्या परीक्षेला ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. २१) दुपारी तीन वाजता त्यांच्या महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका या महाविद्यालयांना वितरण केंद्रावरून शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता दिल्या जाणार आहेत.
यावर्षीच्या परीक्षेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य वितरीत केले होते. या परीक्षेचे साहित्य वितरण केंद्रांवर महाविद्यालयांनी जमा केल्यानंतरच त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. दरम्यान, यावर्षी बारावीचा निकाल दि. ३ ऑगस्ट रोजी ऑनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांतील ४९,९७५ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४९,७४१ जण उत्तीर्ण झाले. त्यात २७,३३८ मुले, तर २२,४०३ मुली आहेत.