उद्यापासून बारावीची पुरवणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:30 AM2021-09-15T04:30:13+5:302021-09-15T04:30:13+5:30
कोल्हापूर : इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गुरुवार (दि. १६) पासून ऑफलाईन पद्धतीने ...
कोल्हापूर : इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गुरुवार (दि. १६) पासून ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर विभागातील एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ही परीक्षा दि. ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
दहावीची पुरवणी परीक्षा दि. २२ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार असून त्यासाठी कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ९०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी विभागामध्ये २२ परीक्षा केंद्रे आहेत. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजता परीक्षा होईल. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना थर्मल गन, सॅनिटायझर, हँडवॉश, साबण पुरविले आहेत. परीक्षेसाठी एका वर्गामध्ये दहा ते बारा परीक्षार्थींची बैठक व्यवस्था असणार आहे. या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी मंगळवारी दिली.