तुझी रे सत्वपरीक्षा...; आईला अग्नी देऊन त्याने दिला बारावीचा पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:12 AM2020-02-19T03:12:26+5:302020-02-19T03:12:44+5:30
रंजना तानाजी पाटील (वय ४८) या काही वर्षांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या
कोल्हापूर : दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा पेपर देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावी ही घटना घडली.
रंजना तानाजी पाटील (वय ४८) या काही वर्षांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा श्रीनाथ हा देवाळे महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकतो. सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करीत बसला होता. मंगळवारी सकाळी आईला उठविण्यासाठी गेला असता ती निपचित पडली होती. तिचा श्वास बंद होता. ती देवाघरी गेल्याचे समजताच नातेवाइकांनी टाहो फोडला. आईच्या चितेला अग्नी देऊन तो पुन्हा जड अंत:करणाने परीक्षेला गेला.