राज्यातील १२ जणी सह्याद्रीतील खडतर सुळके सर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 PM2021-02-24T16:17:15+5:302021-02-24T16:22:50+5:30

tourism Traval Kolhapru- गिर्यारोहणामध्ये राज्यातील मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने गणेश गीध यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून बसाल्ट क्विन मोहीम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली आहे. बारा दिवसांच्या या मोहिमेतून सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९ ते १२ वयोगटांतील १२ मुली सज्ज झाल्या आहेत.

Twelve people from across the state are ready for the Basalt Queen campaign | राज्यातील १२ जणी सह्याद्रीतील खडतर सुळके सर करणार

बसाल्ट क्विन या गिर्यारोहण मोहिमेअंतर्गत सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील बारा मुली सज्ज झाल्या आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देबसाल्ट क्विन मोहिमेसाठी सज्ज, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मोहीम गेल्या पाच महिन्यांपासून एकत्र राहून प्रशिक्षण

 कोल्हापूर : गिर्यारोहणामध्ये राज्यातील मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने गणेश गीध यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून बसाल्ट क्विन मोहीम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली आहे. बारा दिवसांच्या या मोहिमेतून सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९ ते १२ वयोगटांतील १२ मुली सज्ज झाल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून गुरूकुल पद्धतीने एकत्र राहून त्यांनी गिर्यारोहणाचे तंत्रशिक्षण प्रशिक्षण घेण्यासह सराव केला आहे. या मोहिमेद्वारे गिर्यारोहणात नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषेदत सांगितले.

या मोहिमेत कोल्हापुरातील खुशी कांबोज (वय १९), पुण्यातील सौम्या जोशी (१०), गिरीजा लांडे (११), काव्या बोरोलीकर (८), तासगावमधील अरमान मुजावर (२०), मुंबईतील आद्या नायर (१६), नाशिकची तनया कोळी, साताऱ्याची साक्षी प्रभुणे (१६), लोणावळ्यातील तन्वी अहेर (१२), श्रृती शिंदे (१७), ठा‌ण्यातील मायरा सकपाळ (१०), खंडाळ्यातील निशा वाघमारे (१५) सहभागी होतील.

शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या माध्यमातून या मुलींनी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली आहेत. काहींना निवड करण्यापूर्वी गिर्यारोहणाची कल्पनाही नव्हती. क्लायबिंग प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मुली वजीर, नागफणी, संदेवन, वानरलिंगी, तैलबैला, आदी सुळके सर करणार असल्याचे विनोद कांबोज यांनी सांगितले. या पत्रकार परिषेदस प्रमोद पाटील, हृषिकेश केसकर, रोहित वर्तक, नेहा मोरे, कोपल गोयल, दीपक पवार, आनंद गावडे, अनिकेत बोकील उपस्थित होते.
सहभागी बसाल्ट क्विन म्हणाल्या

  • अरमान मुजावर : या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घरातून बाहेर पडले.
  • तनया कोळी : नेतृत्व कसे करायचे, निर्णय कसे घ्यायचे हे समजले.
  • साक्षी प्रभुणे : संघटितपणाचे महत्त्व, वेळेचे नियोजन समजले.
  • आद्या नायर : आत्मनिर्भर कसे व्हायचे याचे ज्ञान मिळाले.
  • खुशी कांबोज : आम्हा सर्वांना गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले.
  • सौम्या जोशी : या प्रशिक्षणामुळे धैर्य, आत्मविश्वास वाढला.

 

Web Title: Twelve people from across the state are ready for the Basalt Queen campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.