बारा हजार जणांनी दिली ‘विक्रीकर निरीक्षक’ परीक्षा
By admin | Published: February 1, 2015 11:18 PM2015-02-01T23:18:58+5:302015-02-02T00:17:21+5:30
रविवारी कोल्हापुरात १२ हजार २२३ जणांनी पूर्वपरीक्षा दिली. जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर ही परीक्षा झाली
कोल्हापूर : विक्रीकर निरीक्षकपदासाठी आज, रविवारी कोल्हापुरात १२ हजार २२३ जणांनी पूर्वपरीक्षा दिली. जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर ही परीक्षा झाली.राज्य लोकसेवा आयोगातर्फे आयोजित या परीक्षेसाठी कोल्हापुरातून १४ हजार ३३१ जणांनी नोंदणी केली. विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, कमला कॉलेज, शहाजी कॉलेज अशा शहरातील ३१ आणि इचलकरंजीतील ६, अशी एकूण ३७ परीक्षा केंद्रे होती. सकाळी ११ ते १२ अशी परीक्षेची वेळ होती. परीक्षार्थींना साडेदहा वाजता केंद्रावर प्रवेश दिला. या परीक्षेसाठी १ हजार ४०२ कर्मचारी कार्यरत होते.
वेळ पुरला नाही...
पूर्वपरीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कठीण होते. बुद्धिमत्ता, गणित विभागातील प्रश्नांची सोडवणूक करताना परीक्षार्थींचा कस लागला. अनेकांनी आजचा पेपर कठीण होता; त्यासाठी वेळ कमी पडला. वेळ पुरला नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.