शेतकऱ्यांची पंचवीस किलोमीटर किसान संदेश पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:23 AM2021-01-08T05:23:42+5:302021-01-08T05:23:42+5:30
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि आंदोलनात शहीद झालेल्यांना अभिवादनासाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी करवीर तालुक्यातील सावर्डे ...
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि आंदोलनात शहीद झालेल्यांना अभिवादनासाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी करवीर तालुक्यातील सावर्डे ते कोल्हापुरातील पापाची तिकटी अशी २५ किलोमीटर किसान संदेश पदयात्रा काढली. यावेळी करवीर तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीमध्ये गेली ४० दिवस अनेक यातना सोसणाऱ्या आंदोलनकारी शेतकऱ्यांप्रती तसेच तेथे जे ५७ शेतकरी शहीद झाले त्यांच्याप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी किसान संघर्ष संदेश पदयात्रा काढण्यात आली. सकाळी ९.३० वाजता जोतिर्लिंग मंदिर, सावर्डेतर्फे असंडोली येथून पदयात्रेला सुरुवात झाली. यात्रा मल्हार पेठ फाटा, चिंचवडे, सांगरुळ फाटा, वाकरे फाटा, बालिंग, रंकाळा टॉवर मार्गी पापाची तिकटी परिसरात आली. येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेची सांगता झाली.
यावेळी बाजीराव खाडे, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, टी. एन. पाटील, भगवान सूर्यवंशी, ज्योतिराम कारंडे, सीताराम सातपुते, सुदर्शन पाटील, विलास पाटील, संभाजी कापडे, बाळू सुतार, संजय पाटील, शहाजी कांबळे, सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, डॉ. टी. एस. पाटील, संभाजी जगदाळे, दिलावर मुजावर, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव उपस्थित होते.
प्रतिक्रिया
जीवन-मरणाचा संघर्ष सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यांच्या भावनेशी जोडले जावे म्हणून आम्ही शरीराला वेदना देत २५ किलोमीटर पदयात्रा काढली. सरकारमधील नेते गांधीजींच्या नावाचा वापर करतात; मात्र त्यांचे तत्त्वज्ञान अत्मसात करत नसल्यामुळे त्यांना सुबुद्धी देण्यासाठी पापाची तिकटी येथील गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन केले.
बाजीराव खाडे राष्ट्रीय सचिव, काँग्रेस
फोटो : ०७०१२०२० कोल किसान पदयात्रा
ओळी : करवीर तालुक्यातील सावर्डे ते कोल्हापुरातील पापाची तिकटी अशी २५ किलोमीटर किसान संदेश पदयात्रा काढण्यात आली.