चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली २0 पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:07 AM2018-11-08T05:07:43+5:302018-11-08T05:07:59+5:30

अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.

Twenty-four books written by students in the fourth | चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली २0 पुस्तके

चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली २0 पुस्तके

Next

- संतोष मिठारी
कोल्हापूर - अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.

सध्या मुले मोबाईलमध्ये जास्त रमत आहेत. अशा स्थितीत त्यांना स्वत: गोष्ट लिहून पुस्तक तयार करायला लावणे. त्यांच्यातील लेखकाचा शोध घेण्यासह त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचा उपक्रम महाराणी शांतादेवी गायकवाड गृहनिर्माण शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालयाने राबविला आहे. उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील चौथीच्या २० विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील भाषाविषय साहाय्यक निशा काजवे आणि वर्गशिक्षिका सारिका पाटील यांनी प्रशिक्षण दिले. क्वेस्टअंतर्गत या विद्यार्थ्यांना पुस्तक लेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

‘आनंदी विद्यालय’ उपक्रमही राबविण्यात आला. प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांकडून पुस्तके लिहून घेण्यात आली. नारळ महागला, मदत का? करावी, शिक्षा कोणाला, चूक कोणाची, मदतीचा हात अशा विविध २० गोष्टींचे लेखन या विद्यार्थ्यांनी स्वानुभव आणि कल्पनाविस्तारावर आधारित केले.
उपक्रमातील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी कार्डशीटपेपरवर गोष्टी लिहून पुस्तके तयार केली आहेत. त्यामध्ये त्यांनी पूरक चित्रेही रेखाटली आहेत. आठ ते १0 पानांची पुस्तके आहेत.

या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चे विचार, कल्पना मांडल्या आहेत. गोष्टीचे पुस्तक लिहिण्याचा हा उपक्रम आता प्रायोगिक तत्त्वावर वर्गपातळीवर राबविला असून, पुढील टप्प्यात शाळा पातळीवर राबविण्याचा मानस आहे. - सारिका पाटील, वर्गशिक्षिका

Web Title: Twenty-four books written by students in the fourth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.