शाळा इमारतीसाठी वीस लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:40+5:302021-04-20T04:26:40+5:30

संस्थापकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दर्जादेखील ...

Twenty lakh assistance for school building | शाळा इमारतीसाठी वीस लाखांची मदत

शाळा इमारतीसाठी वीस लाखांची मदत

googlenewsNext

संस्थापकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दर्जादेखील उत्कृष्ट आहे; परंतु शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होत होत्या. शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावकर्‍यांना व शिक्षकांना सोबत घेऊन खोत यांनी ग्रामस्थांतून जमा झालेली लोकवर्गणी व एम्पथी फौंडेशनच्या प्रमुख सहकार्यातून एक कोटीची प्रशस्त दुमजली इमारत उभारली असून, ती पूर्णत्वास आली आहे. इमारत बांधकामासाठी त्यांनी वीस लाखांची मदत देऊन गावच्या शाळेबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करून वेगळा आदर्श निर्माण केल्यामुळे खोत यांच्या दातृत्वाचे परिसरात कौतुक होत आहे.

कोट....

ज्या शाळेमध्ये शिकून सुसंस्कृत झालो, त्या शाळेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या गावच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून नवीन इमारतीची उभारणी सुरू असून, इमारतीचे काम पूर्ण होताच वेगळे संगणक कक्ष व इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गावच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठी सुसज्ज असे ग्रंथालय उभारणार आहे.

- के. पी. खोत, माळवाडी (ता. पन्हाळा)

Web Title: Twenty lakh assistance for school building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.