महास्वच्छता अभियानाची एकविशी, विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:16 PM2019-09-16T12:16:23+5:302019-09-16T12:20:11+5:30

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद ...

Twenty-one, students participate in the Cleanliness Mission | महास्वच्छता अभियानाची एकविशी, विद्यार्थ्यांचा सहभाग

पंचगंगा नदी परिसरात एकविसाव्या महास्वच्छता अभियानांतर्गत एन.सी.सी. कॅडेटनी स्वच्छता मोहीम राबविली.

Next
ठळक मुद्देमहास्वच्छता अभियानाची एकविशी, विद्यार्थ्यांचा सहभागविवेकानंद, के.एम.सी., गोखले कॉलेजच्या दोनशे विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (के.एम.सी.कॉलेज) व गोपाल कृष्ण गोखले कॉलेजमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी व दोनशे महापालिका अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी १३ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.

विवेकानंद कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेची शपथ दिली व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. जयंती नाला संप व पंप हाऊस, पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसर, रिलायन्स मॉल मागे, कोरे हॉस्पिटल या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात दोन जे.सी.बी., चार डंपरचा वापर करण्यात आला. रोगराई पसरू नये म्हणून धूर, औषध फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली.

यावेळी पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, पर्यावरणवादी उदय गायकवाड, दिलीप देसाई, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य एस. वाय. होनगेकर, गोखले कॉलेजचे प्राचार्य बी. के. पाटील, के. एम. सी. कॉलेजचे प्राचार्य एस. एम. गवळी, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे, मॉर्निंग वॉकचे सुरेश शहा, उल्का शहा, लता चंदवानी, पूजा भोजवानी, ओमप्रकाश भोजवानी, कीर्ती चव्हाण, गीता हेगडे, शीला पाटील, वैजयंती पाटील, आरती दुल्हानी, गुरव सर, नंदा अथने, सुश्मिता गणबोटे, छाया पाटील, झरीना बुवा, अमृता करबकी, मनीषा कुलकर्णी, रजनी डकरे, आरती पाटील, ए. आर. कुलकर्णी, कविता ओबराणी, बाळासो एंडेकर, जिवाजी बेलेकर, मधुकर चव्हाण, राजन डकरे, प्रकाश चौधरी, अमित पाटील, राजेश जाधव, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, आदी सहभागी झाले होते.

 

 

Web Title: Twenty-one, students participate in the Cleanliness Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.