फसवणूकप्रकरणी जयसिंगपूर, सांगलीच्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:07+5:302021-04-09T04:26:07+5:30

जयसिंगपूर : भाजीपाल्याच्या निर्यात व्यवसायामध्ये ५३ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक करावयास भाग पाडून फसवणूक करून दोन वर्षांपासून फरारी ...

Two arrested from Jaisingpur, Sangli in fraud case | फसवणूकप्रकरणी जयसिंगपूर, सांगलीच्या दोघांना अटक

फसवणूकप्रकरणी जयसिंगपूर, सांगलीच्या दोघांना अटक

Next

जयसिंगपूर : भाजीपाल्याच्या निर्यात व्यवसायामध्ये ५३ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक करावयास भाग पाडून फसवणूक करून दोन वर्षांपासून फरारी असणाऱ्या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. शरद व्यंकटेश कुलकर्णी (वय ४८, रा. शाहूनगर जयसिंगपूर) व त्याचा साथीदार प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (वय ४९, रा. पलूस, जि. सांगली) अशी संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयित कुलकर्णी हा भाजीपाला आयात-निर्यात व्यावसायिक आहे. ओळखीचा फायदा घेऊन या व्यवसायामध्ये तिघांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले होते. गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा न झाल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लावला होता. यावेळी संशयित खोटे सांगून वेळ मारून नेत होता. १२ डिसेंबर २०१९ रोजी कुलकर्णी व चव्हाण यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, बुधवारी (दि. ७) दोघे संशयित सांगली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. संशयितांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०८-संशयित प्रमोद चव्हाण, संशयित शरद कुलकर्णी.

Web Title: Two arrested from Jaisingpur, Sangli in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.