पिस्तूल विक्रीप्रकरणी दोघांना अटक, शिरोली नाका परिसरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 06:54 PM2021-11-19T18:54:50+5:302021-11-19T18:55:14+5:30
कोल्हापूर : देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीप्रकरणी येथील शिरोली नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली. विकी धोंडीबा नाईक ...
कोल्हापूर : देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीप्रकरणी येथील शिरोली नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली. विकी धोंडीबा नाईक (वय ३१, रा.आमरोळी, ता. चंदगड) व शुभम शांताराम शिंदे (वय २६, रा. अजुर्नवाडी ता. गडहिग्जल) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे असा १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरच्या प्रवेव्दारावर शिरोली नाक्यावर दोन तरूण गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर तातडीने पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, पोलीस गौरव चौगले आदींच्या यांच्या पथकाने सापळा रचला. विकी व शुभमला ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुलासह एकूण १ लाख ११ हजार ५ रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी दोघांना अटक केली. या दोन्ही संशयितावर शाहूवाडी, चंदगड, मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शनिवारी (दि.२०) त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे.