२० लाखांच्या फसवणुप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:27 AM2021-01-19T04:27:05+5:302021-01-19T04:27:05+5:30
उत्तम छानदेव देशमुख (वय ४३, रा. शिरोळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी राठोड याने दत्त साखर कारखान्यास गळीत हंगामामध्ये ...
उत्तम छानदेव देशमुख (वय ४३, रा. शिरोळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी राठोड याने दत्त साखर कारखान्यास गळीत हंगामामध्ये ऊसतोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून बारा लाख रुपये घेतले होते. रक्कम देऊनही मजूर न पुरविल्याने फसवणूक झाल्याचे देशमुख यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिरोळ पोलिसांत तक्रार दिली, तर प्रशांत विठ्ठल पाटील (वय २३, रा. अर्जुनवाड) यांची संशयित आरोपी बरडे याने ८ लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. दरम्यान, फसवणुकीच्या या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याबरोबर संशयितांनी घेतलेली रक्कम कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे का, या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली, याचा तपास करण्यासाठी संशयितांना पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी केला.