दोन आवळे विरुद्ध मिणचेकर

By admin | Published: October 1, 2014 10:39 PM2014-10-01T22:39:15+5:302014-10-02T00:14:57+5:30

स्वबळामुळे लक्ष्यवेधी लढती : फुटीमुळे मतदारसंघाची गणिते बिघडली

Two axle vs minneckers | दोन आवळे विरुद्ध मिणचेकर

दोन आवळे विरुद्ध मिणचेकर

Next

दत्ता बिडकर - हातकणंगले (राखीव) विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ आहे. मात्र, काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे, जनसुराज्यचे माजी आमदार राजीव किसन आवळे विरुद्ध शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात लढत होईल. स्वाभिमानीचे प्रमोद कदम व राष्ट्रवादीचे दत्तात्रय घाटगे कोणाची डोकेदुखी ठरणार हेही महत्त्वाचे आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकांमध्ये जनसुराज्य आणि शिवसेनेने काबीज केल्यामुळे यावेळी येथे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुती आणि आघाडी या दोन्ही बिघाड्यांमुळे चार पक्ष स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रथमच आमने-सामने आल्यामुळे काँग्रेस-शिवसेनेला प्रारंभी दुरंगी वाटणारा सामना जनसुराज्य आणि ‘स्वाभिमानी’च्या शिरकावामुळे लक्ष्यवेधीकडे वाटचाल करीत आहे. परिणामी, मतदारसंघाची संपूर्ण गणिते बिघडून गेली आहेत.
जयवंतराव आवळे यांना हा मतदारसंघ सोपा होता; पण आघाडीची बिघाडी झाल्यामुळे आणि काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने जयवंतराव आवळे यांचे जवळचे सहकारी दत्तात्रय घाटगे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे आणि आवाडे कुटुंबीयांचे सख्य असल्याने त्याची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न जनसुराज्यकडून होत आहे.
शिवसेनेचे उमेदवार आमदार सुजित मिणचेकर यांना २५ सप्टेंबरअखेर ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. महायुतीचा आपण विद्यमान आमदार असल्याने आपली उमेदवारी निश्चित मानून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, महायुती फुटल्याने समीकरणेच बदलली आहेत. सुजित मिणचेकर यांना शिवसेनेतून सुरुवातीला विरोध होता. हा अंतर्गत वाद संपविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली होती. तरीही सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख व संघटना हा वाद धुमसत आहे. तसेच शिवशक्ती व भीमशक्ती असे समीकरण मागील निवडणुकीमध्ये होते. ते आता या निवडणुकीत रामदास आठवले भाजप-स्वाभिमानीबरोबर गेल्यामुळे बौद्ध समाजाच्या मतांवर परिणाम होण्याची चिंता सुजित मिणचेकर यांना वाटत आहे. जनसुराज्यचे राजू आवळे यांची वारणा पट्टा या विभागावर मोठी भिस्त आहे. या पट्ट्यातील फिक्स पॉकेट लक्षात घेऊन त्यांनी हुपरी-रेंदाळपासून ते रुकडी-माणगावपर्यंत आपले संपर्क अभियान सुरू ठेवले असून, ग्रामीण स्तरावर त्यांचा पाच वर्षांत तुटलेला संपर्क विजयापर्यंत नेणार का? याबाबत साशंकता आहे.
स्वाभिमानीने प्रमोद कदम यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात ४८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, त्यावेळी शिवसेनेची स्वाभिमानीला साथ होती. राष्ट्रवादीने दत्तात्रय घाटगे यांना उमेदवारी दिली आहे. गतवेळी २४ हजार मते त्यांनी स्वाभिमानीकडून लढत असताना मिळविली होती. (अपक्ष उमेदवार : सुरेखा कांबळे, परशराम वाघमारे, शिवमूर्ती पिरापगोळ.)

हातकणंगले
एकूण मतदार ३,0२,२९१
नावपक्ष
सुजित मिणचेकर शिवसेना
जयवंतराव आवळेकाँग्रेस
राजीव आवळे जनसुराज्य
दत्तात्रय घाटगे राष्ट्रवादी
प्रमोद कदम स्वाभिमानी
नंदकिशोर कांबळे कम्युनिस्ट पक्ष
रणजित भोसलेमनसे
कुंदन वाघमारे हिंदू महासभा
नेमचंद शितोळे (लोकशासन पार्टी)
प्रेमकुमार माने बहुजन मुक्ती पार्टी
सर्जेराव फुले भारिप बहुजन महासंघ
नंदकिशोर कांबळे बसपा

Web Title: Two axle vs minneckers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.