घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:02+5:302020-12-08T04:23:02+5:30
इचलकरंजी : येथील बिग बझार रोडवरील एका मंदिराजवळ घरफोडी प्रकरणातील एका अल्पवयीनासह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक ...
इचलकरंजी : येथील बिग बझार रोडवरील एका मंदिराजवळ घरफोडी प्रकरणातील एका अल्पवयीनासह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे एक लाख ८४ हजार १४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शरमोन सुरेश कांबळे (वय २०), चॉँद हुसेन शेख (२३, दोघे, रा. महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत) व एक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी मागील महिन्यात मुक्त सैनिक वसाहत येथे घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरले. तसेच किराणा दुकानातील पत्रा फोडून रोख रक्कम चोरली. कुष्ठरोग वसाहतीत एका घरातील मोबाईल चोरल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कांबळे याच्यावर चोरी व खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी रेकॉर्डवरील असून, आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, बालाजी पाटील, आयुब गडकरी, सूरज चव्हाण यांनी केली.
(फोटो ओळी)
०७१२२०२०-आयसीएच-०३
घरफोडी प्रकरणातील एका अल्पवयीनासह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.