Kolhapur: वाघबीळ घाटात अपघात, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:41 IST2024-05-17T16:40:52+5:302024-05-17T16:41:08+5:30
कोडोली : वाघबीळ-पन्हाळा मार्गावर वळणावर दोन चारचाकी गाड्याची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला तर दोन्ही ...

Kolhapur: वाघबीळ घाटात अपघात, एकजण जखमी
कोडोली : वाघबीळ-पन्हाळा मार्गावर वळणावर दोन चारचाकी गाड्याची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंबेजोगाई जि.बीड येथील गाडी नंबर (एम एच ४४ झेड ५५७५) ही पन्हाळाहून कोल्हापूरला निघाली होती. तर दुसरी गाडी (एम एच ०१ डीई ६७४४) कोल्हापूरहून पन्हाळ्यावर फिरणेसाठी पर्यटक जात होते. यावेळी राक्षी फाट्याजवळच्या वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली.
यात चालक उत्सव उत्तम जाधव (रा. अंबेजोगाई) किरकोळ जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले. अपघाताची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सुनिल नांगरे करीत आहेत.