दोघा चोरट्यांकडून दोन मोटारी, दोन दुचाकी, मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:28+5:302020-12-16T04:39:28+5:30

राजकुमार मलिक व आदित्य दिंडे या दोघांनी जयप्रभा स्टुडिओनजीकच्या स्प्रे पेंटिंग गॅरेजजवळून लाल रंगाची मोटार चोरली व ती मैलखड्डा ...

Two cars, two bikes and a mobile phone were seized from the two thieves | दोघा चोरट्यांकडून दोन मोटारी, दोन दुचाकी, मोबाईल जप्त

दोघा चोरट्यांकडून दोन मोटारी, दोन दुचाकी, मोबाईल जप्त

Next

राजकुमार मलिक व आदित्य दिंडे या दोघांनी जयप्रभा स्टुडिओनजीकच्या स्प्रे पेंटिंग गॅरेजजवळून लाल रंगाची मोटार चोरली व ती मैलखड्डा येथे एका बंद घरात लपवून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पथकाने मैलखड्डा परिसरात पाळत ठेवली. त्यानुसार दोघांना मोटारकारसह पकडले. त्यांची चौकशी केली असता ती मोटार गॅरेजमधून चोरल्याचे सांगितले. पथकाला तपासणीत चोरीचे मोबाईल संच मिळाले. ते मोबाईल ॲक्सेसेरीज फुलेवाडी नाक्याजवळील मोबाईल शॉपीमधून चोरल्याचीही कबुली दिली.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी राजारामपुरीतून आणखी एक मोटार कार व दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून दोन मोटारी, दोन दुचाकी व ५ मोबाईल संच असा सुमारे १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

क्रशर चौकात वाटमारी

क्रशर चौकनजीक भोगावती येथील दुचाकीस्वाराला रात्रीच्यावेळी अडवून त्याला बेदम मारहाण केली, त्यांच्याकडून मोबाईल असलेली पिशवी काढून घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

कारच त्याचे घर

संशयित आदित्य दिंडे याचा ठावठिकाणा एका जागी नसतो. चोरलेली कार म्हणजेच त्याचे घर बनले होते. दिवसभर चोऱ्या व रात्रीच्यावेेळी राजारामपुरीत तो रस्त्याकडेला कार लावून त्यातच झोपत होता. त्यातच त्याचे कपडे, झोपण्याचे साहित्य होते.

फोटो नं. १५१२२०२०-कोल-क्राईम०१

ओळ : जप्त केलेल्या चोरीच्या दोन मोटारी

फोटो नं. १५१२२०२०-कोल-क्राईम०२

ओळ : जप्त केलेले चोरीचे मोबाईल

फोटो नं. १५१२२०२०-कोल- राजकुमार मलीक (आरोपी)

फोटो नं. १५१२२०२०-कोल- आदित्य दिंडे (आरोपी)

(तानाजी)

Web Title: Two cars, two bikes and a mobile phone were seized from the two thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.