शैक्षणिक ॲपला दोन कोटी नेटकऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:22+5:302021-03-13T04:45:22+5:30

शिवाजी सावंत / दुर्गम आणि डोंगराळ भागातील वेसर्डेपैकी सिमालवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शिक्षक जयदीप डाकरे आणि प्रवीण डाकरे ...

Two crore netizens visit the educational app | शैक्षणिक ॲपला दोन कोटी नेटकऱ्यांची भेट

शैक्षणिक ॲपला दोन कोटी नेटकऱ्यांची भेट

Next

शिवाजी सावंत /

दुर्गम आणि डोंगराळ भागातील वेसर्डेपैकी सिमालवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शिक्षक जयदीप डाकरे आणि प्रवीण डाकरे या दोन बंधूंनी स्वखर्चातून तयार केलेल्या शैक्षिणक ब्लॉगला सव्वा दोन कोटी एकतीस लाख सव्वीस हजार ५५८ शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. या ॲपद्वारे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देऊन महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले, तर कोट्यवधी लोकांनी भेट दिलेले शिक्षण क्षेत्रातील हे एकमेव ॲप आहे.

कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्याने प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. यावर उपाय म्हणून सिमालवाडी येथील दोन प्राथमिक शिक्षक बंधूंनी ‘‘माझा अभ्यास’’ हा वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमाचा राज्यातील सव्वा दोन कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांनी लाभ घेतला.

जून महिना उजाडला तरीही शाळा बंदच ! पण शिक्षण मुलांपर्यंत कसे पोहोचवायचे ? याबाबत सगळीकडे संभ्रमावस्था होती. प्रशासनाने देखील ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवा, असे सांगितले होते, पण सुरुवातीला ऑनलाइन -ऑफलाइन शिक्षण देणारा असा कोणताही उपक्रम सुरू नव्हता. या परिस्थितीत मुलांना अभ्यास ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात देण्यासाठी प्रवीण आणि जयदीप डाकरे यांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी’ हा पीडीएफ स्वरूपात उपक्रम १५ जूनपासुन सुरू केला. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दररोजचा प्रत्येक विषयाचा अभ्यास पीडीएफ स्वरूपात समाविष्ट करून प्रत्येक घटकावर ऑनलाइन टेस्ट, एमपीथ्री, व्हिडिओ हायपरलिंक करण्यात आले. त्यामुळे इतर शिक्षकांनादेखील हा अभ्यास पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्यासाठी उपयुक्त ठरला. दररोज या पीडीएफ ऑफलाइन चार ते सात लाख आणि ऑनलाइन अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होत्या. डाऊनलोड सुविधा मिळण्यासाठी डाकरे बंधूंना सर्व्हर प्लॅन विकत घ्यावा लागला. सर्व इयत्तांच्या ऑनलाइन टेस्ट बनविण्यासाठी दररोजचे पीडीएफ निर्मितीचे काम हे प्रवीण करत होते व त्यासाठी लागणारे डिजिटल साहित्य जयदीप निर्माण करत होते. प्रवीण हे भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ शाळेत, तर जयदीप हे चाफेवाडी शाळेत कार्यरत आहेत. या उपक्रमांमध्ये त्यांना संगणक, लाईट, नेट अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण हे दोघे बंधू दररोजचचे अपडेट सातत्याने देत होते.

१५ जून २०२०ला सुरू झालेला हा उपक्रम २८ फेब्रुवारी २०२१ रोजी अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने बंद केला. या कालावधीत जवळपास सव्वा दोन कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. या उपक्रमाने डाकरे बंधूंची तंत्रस्नेही शिक्षक म्हणून महाराष्ट्रात एक नवी ओळख निर्माण झाली.

या उपक्रमासाठी भुदरगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे, वाळवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे लेखिका अंजली अत्रे, शेकडो शिक्षक व पालकांनी कौतुक केले आहे.

फोटो १)जयदीप डाकरे २)प्रवीण डाकरे

Web Title: Two crore netizens visit the educational app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.