वडगावात आजपासून दोन दिवसांचे लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:23+5:302021-04-17T04:24:23+5:30
पेठवडगाव : वडगावात शुक्रवारी आणखी चार कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये आजी-माजी नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, वडगाव पालिकेने ...
पेठवडगाव : वडगावात शुक्रवारी आणखी चार कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये आजी-माजी नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, वडगाव पालिकेने उद्या शनिवार, रविवारी दोन दिवसांचा लाॅकडाऊन केला आहे. सोमवार ते शुक्रवारी किराणा व धान्य दुकाने १० ते ४ वाजेपर्यंत सुरू करावीत, अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. सेवाक्षेत्रात कार्यरत असलेल्या जबाबदार नागरिकांना विळखा बसला आहे. त्यांच्यापासून घरात संसर्ग सुरू आहे.
तसेच अनेक जण एचआरसीटीच्या अहवालानुसार उपचार घेत आहेत. ते कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकही पाठीशी घालत आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाची नेमकी संख्या गुलदस्त्यात राहिली आहे. आज अखेरीस कोरोनाचे लसीकरण पालिकेच्या बळवंतराव यादव हाॅस्पिटल व डाॅ. अशोक चौगुले यांचे गिरिजा हाॅस्पिटल, कुडाळकर हाॅस्पिटलमध्येही लसीकरण करण्यात येत आहे.