दोन उपोषणकर्ते सीपीआरमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:30+5:302021-03-09T04:28:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने सुुरू असलेल्या आमरण उपोषणाअंतर्गत सोमवारी विलास मर्दाने व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने सुुरू असलेल्या आमरण उपोषणाअंतर्गत सोमवारी विलास मर्दाने व नाथा पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा प्रशासनासोबत त्यांची उद्या, बुधवारी दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे.
काळम्मावाडी धरणग्रस्तांच्या पूर्नवसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुुरू आहे. गेल्या पाच दिवसांत तीन कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व पुर्नवसन अधिकाऱ्यांनी उद्या, बुधवारी या प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे तसेच उपोषणकर्त्यांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र आमच्या प्रश्नांवर समाधाकारक व तातडीने पुर्नवसनाच्या उपाययोजना राबवल्या नाहीत तर उपोषण सुुरुच राहणार, असा निर्धार करत नागरिकांनी आंदोलन स्थगित केलेले नाही.
---