रोकडसह सोन्याचे दागिने चोरणारे दोघे परप्रांतीय अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:40+5:302021-04-26T04:20:40+5:30
कोल्हापूर : राजा महाराजा यांच्या काळातील दुर्मीळ नाणी दाखविण्याच्या बहाण्याने मोटारीतील व्यावसायिकाची ८० हजारांच्या रोकडच्या बॅगसह सुमारे ९५ हजारांचा ...
कोल्हापूर : राजा महाराजा यांच्या काळातील दुर्मीळ नाणी दाखविण्याच्या बहाण्याने मोटारीतील व्यावसायिकाची ८० हजारांच्या रोकडच्या बॅगसह सुमारे ९५ हजारांचा मुद्देमाल हाताेहात लंपास करणाश्र्या परप्रांतीय दोघा चोरट्यांना अटक केली. अवघ्या पाच दिवसांत शाहूपुरी पोलिसांनी सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. गणेश नारायण सोलंकी (वय ४०), वीरू दौलत सोलंकी (३६ दोघेही रा. वैद्यवाडी, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे. मूळ रा. गुजरात) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगावेश येथील संदीप प्रकाश पाटील (वय ३५) हे पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित भांडी व खाद्य विक्रीचे दुकान चालवतात. दि, १८ एप्रिलला त्यांची अनोळखी दोघांशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी संदीप पाटील याला आपल्याकडे राजा महाराज काळातील नाणी-दागिने आहेत. ते दाखविण्याच्या बहाण्याने दोघेही संदीपच्या गाडीत बसले. त्यांनी संदीपला बोलण्यात गुंतवून त्याची मोटारीतील ८० हजार रोकड व सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असलेली बॅग हाताेहात लंपास केली. त्याबाबत शाहुपूरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. संशयित परप्रांतीय भाषेत बोलत होते. त्याअनुषंगाने शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केला.
संशयित आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा हाती नसल्याने त्यांचा शोध लावणे आव्हान होते; पण पोलीस ठाण्यातील दिग्विजय चौगुले यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित शनिवारी रात्री तावडे हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती काढली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी गणेश सोळंकी व वीरू सोळंकी यांना अटक केली.
ही कारवाई शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण व शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशांत घोलप, युवराज पाटील, किरण वावरे, दिग्विजय चौगले, सुशील सावंत तसेच गुन्हे शोध पथकातील हे. कॉ. ऋषिकेश पोवार, रामदास बागूल, धर्मेंद्र बगाडे, सागर माने, शमम संकपाळ यांनी केली.
वेशांतर करून संशयितांना पकडले
संशयितांना फक्त फिर्यादी संदीप पाटील हेच ओळखत होते. त्यामुळे इतर पोलिसांनी वेशांतर करून तावडे हॉटेल परिसरात सापळा रचला. संशयित तेथे आल्यानंतर फिर्यादीने इशारा दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून दोघाही संशयितांना पकडले. संशयित आरोपी गणेश सोलंकी याच्यावर कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत.
फोटो नं. २५०४२०२१-कोल-गणेश सोलंकी (आरोपी)
फोटो नं. २५०४२०२१-कोल-वीरू सोलंकी (आरोपी)
===Photopath===
250421\25kol_9_25042021_5.jpg~250421\25kol_10_25042021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २५०४२०२१-कोल-गणेश सोलंकी (आरोपी)फोटो नं. २५०४२०२१-कोल-विरु सोलंकी (आरोपी)~फोटो नं. २५०४२०२१-कोल-गणेश सोलंकी (आरोपी)फोटो नं. २५०४२०२१-कोल-विरु सोलंकी (आरोपी)