चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 08:35 PM2017-09-01T20:35:58+5:302017-09-01T20:35:58+5:30
कोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित विलास ऊर्फ भैºया छना शिंदे (वय ४५), सिकंदर गोविंद काळे (२६, दोघे रा. इटकूर, ता. कळंब-उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.
जिल्'ात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. महिन्याभरात ६० हून अधिक घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबादमधील इटकूर येथील एका वसाहतीवर छापा टाकून संशयित दत्ता आत्माराम काळे, रामेश्वर छना शिंदे, राजेंद्र आबा काळे, अनिल भगवान काळे (४९, सर्व रा. इटकूर, ता. कळंब) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८६ हजार ४० रुपये किमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ हजार ११० रुपये किमतीचे २११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १२ चलनी नोटा, त्यामध्ये या पाच देशांचे परकीय चलन, तीन मोबाईल, कॅमेरा, चाकू व एक पंच असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांनी चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने कळंब येथील प्रशांत वेदपाठक या सराफाला विकले होते. त्यानुसार पोलिसांनी वेदपाठक याला अटक केली.