पन्हाळ्याच्या पायथ्याशी दोन गवे मृतावस्थेत आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 03:46 PM2022-04-29T15:46:54+5:302022-04-29T15:47:24+5:30
पावनगडच्या दक्षिण बाजुस जंगल परीसरात कायम पाण्याचा स्त्रोत असलेले गणेश तळे आहे. या ठिकाणी गव्यांचे वास्तव्य असते.
पन्हाळा : पन्हाळा आणी पावनगडाच्या पायथ्याशी गणेश तळे किंवा ऊंबराचा माळ परिसरात दोन गवे मृत अवस्थेत आढळुन आले. वन विभागाने दोन्ही ही गवे वृद्धापकाळाने मृत झाल्याची माहिती दिली. आज, शुक्रवारी हे मृत गवे निदर्शनास आले.
पावनगडच्या दक्षिण बाजुस जंगल परीसरात कायम पाण्याचा स्त्रोत असलेले गणेश तळे आहे. या ठिकाणी गव्यांचे वास्तव्य असते. या परिसरात सुमारे ५० ते ६० गवे आढळून येतात. मुबलक चारा आणी झाडांची सावली व भरपुर पाणी असलेने ऐन उन्हाळ्यात गवे व अन्य प्राणी या तळ्यावर पाणी पिण्यासाठी गणेश तळ्याचा आधार घेतात.
वनरक्षक अमर माने यांना हे दोन गवे मृत अवस्थेत आढळुन आले. त्यांचे शवविच्छेदन केले असता त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे वनपाल विजय दाते यांनी सांगितले.