सदर बाजारमध्ये दोन गटात हाणामारी, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:41+5:302021-07-27T04:26:41+5:30

कोल्हापूर : सदर बाजार परिसरात दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीत तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १२ जणांवर शाहुपूरी ...

Two groups clashed in the market, leaving three injured | सदर बाजारमध्ये दोन गटात हाणामारी, तिघे जखमी

सदर बाजारमध्ये दोन गटात हाणामारी, तिघे जखमी

Next

कोल्हापूर : सदर बाजार परिसरात दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीत तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १२ जणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांनी काठ्या, धारदार हत्यारांचा वापर केला. योगेश राजू लाटकर (वय २७, रा. विचारेमाळ, कांदेकर गल्ली, सदर बाजार) याच्यासह रोहन सुहास होळकर (वय २०), ओमकार सुमद्रे (वय २३, दोघेही रा. सदर बाजार) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश लाटकर हा हॉटेल महाराजासमोर लायकर टी स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी रोहन होळकरसह सातजणांनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला. यावेळी योगेशला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये योगेश याच्या दोन्ही हातावर, पाठीवर, डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन शाहुपूरी पोलीस ठाण्यात रोहन होळकर, बबलू बिरांजे, गब्बर सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, ओमकार समुद्रे तसेच अनोळखी २ ते ३ जण (सर्व रा, सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, रोहन सुहास होळकर याने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार, तो मित्रांसह शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. त्यावेळी रिंकेश लाटकर याच्यासह पाचजणांनी तेथे येऊन ‘तू पियुश पवार याला का मारहाण केलीस?’ असा जाब विचारला. त्यावेळी रोहन व ओंकार समुद्रे हे दोघे पळून जाताना हल्लेखोरांनी त्याला पाठलाग करुन कटरसारख्या धारदार हत्याराने तसेच लाथाबुक्क्यांनी मारुन जखमी केले. याप्रकरणी रोहन होळकर याने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस ठाण्यात रिंकेश राजू लाटकर (२५), योगेश राजू लाटकर (२७), तेजस राजू लाटकर (२९), पिल्या राजू लाटकर (२२), पियुष पवार (२०, सर्व रा, सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करत आहेत.

Web Title: Two groups clashed in the market, leaving three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.