एसटीच्या दोनशे कर्मचाऱ्यांना पुन्हा मुंबईची ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:43+5:302021-04-24T04:24:43+5:30
मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱी कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ...
मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱी कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून एस. टी. महामंडळातील ठराविक चालक-वाहकांना तेथे प्रत्येकी ८ ते १५ दिवसांकरिता कर्तव्य बजावण्याचे फर्मान प्रशासनातर्फे काढले जाते. अशाच कर्तव्यासाठी कोल्हापुरातून मागील आठवड्यात गेलेल्या ३६ चालक-वाहकांपैकी २० जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे चालक वाहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शुक्रवारी पुन्हा महामंडळातर्फे कोल्हापूर विभागातील प्रत्येकी शंभर वाहक चालकांना बेस्टमध्ये सेवा बजाविण्यासाठी फर्मान सोडले आहे. या नव्या फर्मानामुळे कर्मचारी संतप्त झाले असून, जाण्यास विरोध होऊ लागला आहे. कर्मचारी संघटनांही आज, शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडणार आहेत.
कोट
गेल्या आठ दिवसांत सेवा बजावण्यासाठी गेलेल्या ३६ पैकी २० चालक, वाहक कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नव्याने दोनशेजणांना पाठवून कर्मचाऱ्यांच्या जिवाशी महामंडळाने खेळू नये.
- उत्तम पाटील , जिल्हाअध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, कोल्हापूर विभाग