उचगावजवळ ट्रकला दुचाकीची धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:35+5:302021-06-06T04:18:35+5:30

उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बेळगावकर गॅरेजच्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसून दोघे जखमी झालेत. निखिल ...

Two injured in truck collision near Uchgaon | उचगावजवळ ट्रकला दुचाकीची धडक, दोन जखमी

उचगावजवळ ट्रकला दुचाकीची धडक, दोन जखमी

googlenewsNext

उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बेळगावकर गॅरेजच्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसून दोघे जखमी झालेत. निखिल हिंदूराव जाधव ( वय-२८, रा. कणेरीवाडी, ता. करवीर), मागील बाजूस बसलेली अनोळखी व्यक्ती हे दोघे भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला (एमएच-१२ -एयू-८९५०)पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने मृत्युंजय दूत संदीप गुंडोपंत संकपाळ यांनी फोनवरून महामार्ग पोलीस मदत केंद्र, उजळाईवाडी येथील पोलीस निरीक्षक सुरेश नलवडे यांना कळवले. सपोनि नाईक (मॅडम), पोलीस अंमलदार राहुल देसाई, प्रमोद पाटील यांनी जखमींना खासगी दवाखान्यात दाखल केले. अपघाताची नोंद गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यत झालेली नव्हती.

Web Title: Two injured in truck collision near Uchgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.