नक्षल चकमकीत दोन जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:50 AM2017-06-25T00:50:58+5:302017-06-25T00:50:58+5:30

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील दोन स्वतंंत्र चकमकीत शनिवारी दोन जवान शहीद तर अन्य पाच जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे

Two jawans martyred in Naxal encounter | नक्षल चकमकीत दोन जवान शहीद

नक्षल चकमकीत दोन जवान शहीद

Next


तासगाव बाजार समितीचे चित्र : दोन वर्षात आश्वासनांच्या बोलाची कढी आणि बोलाचाच भात!--तासगाव बाजार समितीतून...

दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक निवडणूक ठरलेल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी मतदारांपुढे आश्वासनांचा डोंगर उभा केला होता. मात्र गेल्या दोन वर्षांचा कारभार पाहिल्यानंतर ही आश्वासने बोलाच्या कढीप्रमाणे राहिली. राष्ट्रवादीच्या सत्तेचा राजकीय अड्डा बनलेल्या बाजार समितीत विकासाचा खड्डा कायम राहिल्याचे चित्र आहे.
कोट्यवधी रुपयांच्या बेदाण्याच्या उलाढालीमुळे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशभरात प्रसिध्द आहे. या बाजार समितीची दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. भाजप आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर झाली. अत्यंत अटीतटीच्या आणि वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळवले. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या विस्तारित बेदाणा मार्केटच्या पूर्णत्वाचा विषय अजेंड्यावर होता. त्याचबरोबरच शेतकऱ्यांच्या सोयी-सुविधा, जनावरांचा बाजार, यासह अनेक आश्वासनांचा डोंगर निवडणुकीच्या काळात उभारण्यात आला होता.
निवडणुकीनंतर प्रबळ दावेदार असणाऱ्या अविनाश पाटील यांच्याकडे सभापतिपदाची सूत्रे आली. खुर्चीच्या अट्टाहासातून काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला. मात्र गेल्या दोन वर्षांत निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची अवस्था बोलाचा भात आणि बोलाची कढी अशी ठरली. बाजार समितीच्याच नव्हे, तर शहराच्या विकासाला चालना देणारा विस्तारित बेदाणा मार्केटचा विषय मार्गी लावण्यात सत्ताधाऱ्यांना साफ अपयश आले. व्यापाऱ्यांचा रोष ओढावून घेतल्याने व्यापाऱ्यांनी विस्तारित मार्केटकडे पाठ फिरवली, तर नियोजनाच्या भोंगळ कारभारामुळे लिलाव होऊनही पुढील प्रक्रिया ठप्प राहिली.
केवळ सत्ताकारणाचा राजकीय अड्डा म्हणूनच राष्ट्रवादीकडून गेल्या दोन वर्षात बाजार समितीचा वापर करण्यात आला. कुरघोडी पलीकडे बाजार समितीतून कोणताच विकास साधला गेला नाही. शेतकऱ्यांच्या भल्याचे काही निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र या निर्णयातून चांगले फलित मिळण्याऐवजी दुष्परिणामच जास्त झाले.
सत्तेत येण्यापूर्वी बाजार समितीत प्रशासकांच्या ताब्यात होती. मात्र प्रशासकांच्या काळात झालेल्या नफ्यापेक्षाही सत्ताधाऱ्यांच्या काळात उत्तन्नात घट झाली. त्यामुळे केवळ पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करुन बाजार समितीच्या समस्या मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून, पदाधिकारी बदलानंतर तरी विस्तारित मार्केटचा प्रश्न मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.+


विस्तारित मार्केटचे भवितव्य अधांतरी?
बेदाण्याचे विस्तारित आणि भव्य मार्केट उभारण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सर्व नियोजन पूर्ण केले होते. मार्केटच्या कामाची सुरुवातदेखील झाली होती. मात्र प्रशासकाच्या काळात मार्केटमधील गाळे लिलावाची प्रक्रिया सुरु असतानच, राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लिलाव प्रक्रियेला खोडा घातला होता. तेव्हापासून अद्यापपर्यंत हे मार्केट जैसे थे अवस्थेत आहेत. या मार्केटवरुन व्यापारी, खरेदीदारांनाही राजकारणाची बाधा झाली. त्यामुळे या मार्केटचे भवितव्य अधांतरी असून, हा प्रश्न मार्गी कसा लागणार? याची उत्सुकता आहे.


आर. आर. आबांच्या पुतळ्याचे काम रखडले
नगरपालिका निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच आबांच्या पुतळा पूर्णत्वास नेण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढची कोणतीच कार्यवाही आजअखेर झालेली नाही.

आर. आर. आबांच्या पुतळ्याचे काम रखडले
नगरपालिका निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच आबांच्या पुतळा पूर्णत्वास नेण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढची कोणतीच कार्यवाही आजअखेर झालेली नाही.

Web Title: Two jawans martyred in Naxal encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.