तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 04:59 PM2023-06-17T16:59:58+5:302023-06-17T17:00:15+5:30

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून ...

Two killed in an accident at Honga on the Pune-Bengaluru National Highway | तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

googlenewsNext

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची भीषण धडक झाली. या तिहेरी अपघातात दोघे जागीच ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला. होनगा नजीक बेन्नाळी पुलावर ही घटना घडली. 

ठार झालेल्या दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव पांडुरंग मारुती जाधव (वय 60 वर्षे, रा. कोल्हापूर) असे आहे. दुसऱ्या मृताचे नाव समजू शकले नाही. गंभीर जखमीला उपचारासाठी बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघातग्रस्त कारमधील सर्वजण बेळगावात विश्व हिंदू परिषदेच्या धर्मांतर बंदी कायदा रद्द विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून निघाले होते. दरम्यान होनगा नजीक बेन्नाळी पुलावर कारची कंटेनरला पाठीमागून धडक झाली. याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची कारला जोराची धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.  

अपघाताची माहिती मिळताच काकतीचे ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी पोलिस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. सदर अपघाताची काकती पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two killed in an accident at Honga on the Pune-Bengaluru National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.