कोल्हापूरच्या दोघांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 02:53 PM2021-08-02T14:53:54+5:302021-08-02T14:57:00+5:30
Police Kolhapur : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील १६२ पोलिसांना उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलीस नाईक सरदार श्रीपती पाटील (कळे पोलीस ठाणे), पोलीस नाईक विश्वजित शांतीनाथ गाडवे (चंदगड पोलीस ठाणे) या दोघांचा समावेश आहे.
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील १६२ पोलिसांना उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलीस नाईक सरदार श्रीपती पाटील (कळे पोलीस ठाणे), पोलीस नाईक विश्वजित शांतीनाथ गाडवे (चंदगड पोलीस ठाणे) या दोघांचा समावेश आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या उपनिरीक्षक पदाच्या विभागीय मर्यादित मुख्य स्पर्धा परीक्षेत १६२ पोलीस कर्मचारी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत आले होते; पण त्यांना उपनिरीक्षक पदावर प्रत्यक्ष पदोन्नती मिळाली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून न्यायालयात पुनर्याचिका दाखल केल्या होत्या.
उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पदावर बढतीचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकपदाच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
पदोन्नती मिळालेल्या पोलिसांना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना केले आहे. विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना पदोन्नतीसाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागली. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला.