प्रकाश मोरे यांच्याकडून धम्म भवन ट्रस्टला दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:15+5:302021-02-18T04:45:15+5:30
कोल्हापूर : येथील प्रबोधनाचे भरीव काम करणाऱ्या धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश मोरे आणि त्यांच्या ...
कोल्हापूर : येथील प्रबोधनाचे भरीव काम करणाऱ्या धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर, ट्रस्टी डॉ. दयानंद ठाणेकर, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. विजय महाजन, ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड. सचिन आवळे, ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. शैलजा चव्हाण, सरकारी वकील एस. एम. पाटील, ॲड. चिंतामणी कांबळे, ॲड. वारणा पोळ, ॲड. विकास खाडे, ॲड. विलासराव दळवी, ॲड. समीर पाटील, ॲड. विरसेन खांडेकर, डॉ. दिलीप प्रसाद, राहुल शेजावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टने गेली पाच-सहा वर्षे सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रांमध्ये भरीव असे काम केले आहे. विविध महामानवांचे विचार लोकापर्यंत तटस्थपणे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
फोटो नं. १७०२२०२१-कोल-धम्म भवन ट्रस्ट
ओळ : कोल्हापुरात धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टला ॲड. प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन लाख रुपये मदतीचा धनादेश ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर, विश्वस्त डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला.