उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘कोल्हापूर दक्षिण’मधून दोन लाख शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:35+5:302021-05-13T04:24:35+5:30

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदान करण्याबाबतच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधून ...

Two lakh donations from 'Kolhapur South' through spontaneous public participation | उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘कोल्हापूर दक्षिण’मधून दोन लाख शेणीदान

उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘कोल्हापूर दक्षिण’मधून दोन लाख शेणीदान

Next

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदान करण्याबाबतच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधून दोन लाख शेणी दान केल्या जातील, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात त्यांच्या हस्ते आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे ‘कोल्हापूर दक्षिण’मधील लोकसहभागातून जमलेल्या ८६ हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.

आमदार पाटील यांच्या आवाहनास ‘कोल्हापूर दक्षिण’ मधील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. आमदार पाटील यांनी एक लाख शेणी देण्याचे जाहीर केले होते; पण लोकांच्या प्रतिसादामुळे किमान दोन लाख शेणी दान केल्या जाणार आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध ३५ गावांमधील पहिल्या टप्प्यात सांगवडेवाडी, नंदगाव, खेबवडे, गिरगाव, इस्पूर्ली, न्यू वाडदे वसाहत, पाचगाव, नेर्ली, दऱ्याचे वडगाव, गांधीनगर, तामगाव, नागाव, उजळाईवाडी येथील कार्यकर्ते हे ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनांतून शेणी घेऊन आले. त्यांनी अवघ्या दोन दिवसांत शेणी जमा केल्या आहेत. महापालिका आयुक्तांकडे शेणी सुपूर्द करताना माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील, करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले आदी उपस्थित होते.

संकटकाळात माणुसकी जपली

कोरोनाच्या या काळात कोल्हापूर दक्षिणच्या जनतेने माणुसकी जपली आहे. जिथे अडचणीची परिस्थिती उद्भवेल त्याठिकाणी पाटील कुटुंबीय आणि कार्यकर्ते कोरोनाविरुद्ध लढतील. दोन लाखांपैकी उर्वरित शेणी पुढील दोन दिवसांत टप्प्याटप्प्याने जमा केल्या जाणार आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

फोटो (१२०५२०२१-कोल-महापालिका शेणीदान) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधून लोकसहभागातून जमलेल्या शेणी आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी निलोफर आजरेकर, संजय मोहिते, प्रकाश पाटील, मीनाक्षी पाटील, जयवंत उगले उपस्थित होते.

===Photopath===

120521\12kol_5_12052021_5.jpg

===Caption===

फोटो (१२०५२०२१-कोल-महापालिका शेणीदान) : कोल्हापूर दक्षिण मतदार संघामधून लोकसहभागातून जमलेल्या शेणी आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी निलोफर आजरेकर,  संजय मोहिते,  प्रकाश पाटील, मिनाक्षी पाटील,  जयवंत उगले उपस्थित होते.

Web Title: Two lakh donations from 'Kolhapur South' through spontaneous public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.