संग्राम पाटील यांच्या घरासाठी दोन लाखांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:12+5:302020-12-05T04:49:12+5:30
कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथील संग्राम पाटील हे हसत-हसत हुतात्मा झाले. पित्याची छत्रछाया हरपलेल्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील ...
कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथील संग्राम पाटील हे हसत-हसत हुतात्मा झाले. पित्याची छत्रछाया हरपलेल्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील गेलेले हास्य पुन्हा फुलू दे, अशी प्रार्थना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केली. शहीद जवान पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने मुश्रीफ यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत दोन लाखांची आर्थिक मदत पाटील कुटुंबीयांना दिली.
फौंडेशनच्या वतीने ही मदत दिली. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जवान संग्राम पाटील शहीद झाल्याचे समजतात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने निगवे खालसा येथे भेट देऊन पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे तत्काळ दोन लाखांचा धनादेश कुटुंबीयांना दिला. मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शहीद जवानांना मदत दिली असून, त्यांचा हा उपक्रम समाजाला दिशादर्शक असाच आहे. यावेळी ‘करवीर’चे उपसभापती सागर पाटील, ‘बिद्री’चे संचालक श्रीपती पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, जगदीश पाटील, उपसरपंच अशाेक किल्लेदार, दत्ता पाटील-केनवडेकर, आदी उपस्थित होते.
पाटील कुटुंबाच्या पाठीशी....
संग्राम पाटील यांचे बुधवारी उत्तरकार्य होते. त्यांच्या दोन्ही लहान मुलांना पाहून उपस्थित गहिवरत होते. या लहान मुलांसह पाटील कुटुंबीयांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूरजवळील निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने बुधवारी दोन लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, नविद मुश्रीफ, श्रीपती पाटील, आदी उपस्थित होते.
(फोटो-०२१२२०२०-कोल-निगवे खालसा)
- राजाराम लोंढे