गोगवे शीतकरण केंद्रात दोन लाख लिटर रेफ्रिजरेशन प्लॉन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:15+5:302021-05-26T04:24:15+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गोगवे शीतकरण केंद्राच्या दोन लाख लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेशन प्लॉन्टचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गोगवे शीतकरण केंद्राच्या दोन लाख लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेशन प्लॉन्टचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर वाढीव विद्युत ट्रान्सफॉर्मरचे व क्युबिकल मिटरिंग रूमचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्याहस्ते करण्यात आले.
शाखाप्रमुख सुधाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, सध्या चिलिंग सेंटरकडे रोज १ लाख लिटर दुधाचे संकलन होत असून, पुढील काळात दूध संकलन दोन लाख लिटरपर्यंत वाढविण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. दिलीप गवळी यांनी आभार मानले.
संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, गोगवे शाखाप्रमुख सुनील पाटील तसेच चिलिंग सेंटरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या गोगवे (ता. शाहूवाडी) येथील चिलिंग सेंटरमध्ये दोन लाख लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेशन प्लॉन्टचे उद्घाटन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संचालक उपस्थित होते. (फाेटो-२५०५२०२१-कोल-गोकुळ)