आणखी दोन पेट्रोल पंपांची तपासणी
By admin | Published: June 24, 2017 12:46 AM2017-06-24T00:46:26+5:302017-06-24T00:46:41+5:30
नाशिक : इंधनाची चोरी करणाऱ्या ग्रामीण भागातील दोन पेट्रोलपंप सील केल्यानंतर ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरातील एक व घोटी येथील एक अशा दोन पेट्रोलपंपाची संशयावरून तपासणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्था बंद करा’, ‘फी वाढ रद्द झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत डोनेशन, फी वाढीविरोधात शिवसेनेने शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांना दिले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक हे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जमले. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात त्यांनी निदर्शने केली. ‘पालकांना लुटणाऱ्या शिक्षणसम्राटांचा धिक्कार असो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
त्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालक गोंधळी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिवाय आंदोलनकर्त्यांनी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी केलेली शुल्कवाढ, त्यांच्याकडून होणारी डोनेशनची मागणी, प्रवेश अर्जासाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क, आदींबाबतच्या तक्रारी मांडल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. यावर शिक्षण उपसंचालक गोंधळी यांनी आठ ते दहा दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी बी. एस. कासार, महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पी. एस. सुर्वे, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार आदी उपस्थित होते.
आंदोलनात शिवसेनेचे सुनील जाधव, तुकाराम साळोखे, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, रणजित जाधव, पूजा भोर, रूपाली कवाळे, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे, अविनाश कामते, पीयूष चव्हाण, आदींसह पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.