कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार, दहा आमदार ‘भाजप’चेच असतील: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:13 AM2018-06-04T00:13:07+5:302018-06-04T00:13:07+5:30

Two MPs, ten MLAs from Kolhapur district will be from BJP: Chandrakant Patil | कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार, दहा आमदार ‘भाजप’चेच असतील: चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार, दहा आमदार ‘भाजप’चेच असतील: चंद्रकांत पाटील

Next


भादोले : केंद्र व राज्यात सत्ता असलेला भारतीय जनता पक्ष विकासकामे आणि विविध योजनांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचे दोन खासदार व दहा आमदार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे भाजपचे हातकणंगले तालुक्यातील बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा उत्साहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई, सभापती रेश्मा सनदी, दलितमित्र अशोकराव माने, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, सतीश घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जिल्हा परिषद, सहा नगरपरिषदा, इचलकरंजी नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका स्थायी सभापती भाजपने खेचून आणल्या आहेत. जिल्ह्यात कॉँग्रेसचा एकही आमदार नाही. सतेज पाटलांनी महापालिकेत हिम्मत होती तर नगरसेवकांना खुले सोडायला हवे होते, नाहीतर आम्हीच आघाडीवर होतो, असा टोला लगावला.
सुरेश हाळवणकर महाराष्टÑ शासन व केंद्र शासन योजनांचा आढावा घेताना म्हणाले, हजारो शेतकऱ्यांना शासनाची कर्जमाफी दिली. विविध योजनांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेतला. अशा मतदारांनी मतदान केल्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई यांनी मार्गदर्शन केले.
स्वागत भाजप सरचिटणीस तानाजी ढाले, प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. नानासाहेब जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत सुदर्शन खाडे, आण्णासाहेब शेंदुरे, अंजना श्ािंदे, सयाजी पाटील, उत्तम पाटील, अमित कांबळे, देवानंद कांबळे, प्रज्योत शहा, धनंजय गोंदकर, ग्रा. पं. सदस्य सोनाली जाधव यांच्यासह भाजप तालुका बूथप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावर वडगाव नगराध्यक्षांची उपस्थिती
वडगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी अचानक व्यासपीठावर प्रवेश करताच काहींच्या भुवया उंचावल्या. यावेळी आमदार हाळवणकर म्हणाले, वडगावचे नगराध्यक्ष माळी व भाजपचे डॉ. अशोक चौगुले पूर्वी एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र, आज माळी यांच्या येण्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजपचा विजय निश्चित झाला आहे. माळी यांना राज्यपातळीवरील ओबीसीचे पद आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Two MPs, ten MLAs from Kolhapur district will be from BJP: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.