चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:01+5:302021-02-06T04:43:01+5:30

कोल्हापूर : कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा करत अथवा पायी चालत जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावून (चेन स्नॅचिंग) ...

Two notorious chain snatchers arrested | चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक

Next

कोल्हापूर : कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा करत अथवा पायी चालत जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावून (चेन स्नॅचिंग) नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ९ जबरी चोऱ्यांमधील २२७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. चंद्रकांत महावीर माने (वय २६) व शक्ती सखाराम माने (वय १९, रा. माणकापूर, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे हे दोघे अशाच चोरीतील चिताक विकण्यासाठी येणार् असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला कळले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या दोघांना २२ जानेवारीला ताब्यात घेतले. यावेळी अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ५० ग्रॅम सोन्याचे चिताक मिळाले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अशाप्रकारच्या चोरीची कबुली दिली. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजारांचे २२७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, नितीन चौथे, अजय वाडेकर, अमोल कोळेकर, अर्जुन बंद्रे, कृष्णात पिंगळे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, ओंकार परब, अजय सावंत, संदीप तळेकर, अमर वासुदेव, संजय पडवळ, संतोष पाटील, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडकर यांनी केली.

राधानगरी, मुरगूड, शिरोळमधील गुन्हे..

चौकशीत त्यांच्याकडून राधानगरी, मुरगूड, गोकुळ शिरगाव, शिरोळ याठिकाणी प्रत्येकी दोन, तर हातकणंगले पोलिसांत एक अशा नऊ गुन्ह्यांची उकल झाली. त्यांनी या परिसरात चेन स्नॅचिंग केल्याचे उघडकीस आले.

फोटो : ०४०२२०२१-कोल-आरोपी (एलसीबी)

ओळी : कोल्हापुरात गुुरुवारी नऊ जबरी चोरीप्रकरणी दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: Two notorious chain snatchers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.