‘स्वाईन फ्लू’ने दोन रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 09:51 PM2017-07-26T21:51:11+5:302017-07-26T21:54:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. त्यामुळे जानेवारी २०१७ नंतर जिल्'ात ‘स्वाईन’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्'ातील शासकीय रुग्णालयात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ८ रुग्ण हे सीपीआरमध्ये दाखल आहेत.
बुधवारी मृत्यू झालेल्यांतील रघुनाथ सावंत यांना दि. १६ जुलैला उपचारासाठी सीपीआर रग्णालयात दाखल केले होते. २० जूननंतर त्यांच्यात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना सीपीआरमधील ‘स्वाईन’च्या विशेष कक्षात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर ‘स्वाईन’ प्रतिकार करणारे औषधोपचार सुरू होते; पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे लता कुसरेजा या महिलेतही स्वाईनसदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना २० जुलैपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्याही रक्ताची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचाही बुधवारी मृत्यू झाला.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि ऊन या दोन हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढतो. या बदलत्या वातावरणामुळे विशेषत: ग्रामीण भागात संख्या लक्षणीय दिसत आहे. प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्षानंतर आजार बळावल्यावर रुग्ण गंभीर अवस्थेत सीपीआरकडे येत असल्याचे दिसत आहे.
सध्या जिल्'ात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये १२ पॉझिटिव्ह तर ७ संशयित रुग्ण आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह ३ तर ५ संशयित रुग्णांची वाढ झाली, असून ते सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. या पॉझिटिव्ह तीन रुग्णांपैकी २ कोल्हापूर शहरातील तर १ रुग्ण हा सांगली शहरातील आहे तर आठ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला
आतापर्यंत १५१ रुग्णांवर उपचार
जानेवारीपासून आतापर्यंत १५१ स्वाईन फ्लूची लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६५ पॉझिटिव्ह होते, तर उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.
दक्षता घ्या..
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळणे. सर्दी व खोकला आल्यावर तोंडावर रूमाल लावणे, थंडी, ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, उलटी, मळमळ अशी ‘स्वाईन’ची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यास ‘स्वाईन’चा संसर्ग रोखता येतो.
१५ पैकी ८ मृत कोल्हापूर जिल्'ातील
गेल्या सात महिन्यांत ‘स्वाईन’मुळे जिल्'ात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८ रुग्ण हे कोल्हापूर जिल्'ातील इतर ७ रुग्ण हे कर्नाटक, सांगली, रत्नागिरी या जिल्'ांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.