Kolhapur अनधिकृत मदरसा कारवाई प्रकरण: बसवर दगडफेक करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:24 AM2024-02-03T11:24:12+5:302024-02-03T11:25:13+5:30
दसरा चौकातील घटना : तिघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : लक्षतीर्थ येथील अनधिकृत मदरशावरील कारवाई झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी दसरा चौकात झालेल्या दगडफेकप्रकरणी शुक्रवारी अकबर मोहल्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. जाफर मंजूर सिनदी (वय २०), सुबेध शमशुद्दीन मुजावर (वय २७, रा. दोघेही : सोमवार पेठ, अकबर मोहल्ला, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, महापालिका आणि पोलिस प्रशासन मदरशावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी शहरातही तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी दसरा चौकात अहमदनगर जिल्ह्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाची सहल आली होती. त्यातील विद्यार्थ्यांना बसमधून उतरताना देवदेवतांची नावे घेऊन जोरदार घोषणा दिल्यावर बसवर दगडफेक झाली होती. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यावेळी एका कारवरही दगडफेक झाली.
या घटनेची गंभीर नोंद घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी दगडफेेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री उशिरा जाफर आणि सुबेधसह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी या तिघांनी इतर साथीदारांच्या मदतीने दगडफेक केल्याची कबुली दिली. यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.