कळंबा कारागृहातील कोरोनाबाधीत दोघा कैद्यांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 12:06 PM2021-05-14T12:06:08+5:302021-05-14T12:08:06+5:30
CoronaVIrus In Kolhapur Jail : कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी कैद्यांवर उपचारासाठी खास तयार केलेल्या कोवीड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धुम ठोकली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी कैद्यांवर उपचारासाठी खास तयार केलेल्या कोवीड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धुम ठोकली.
पलायन केलेल्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला प्रतिक सुहास सरनाईक (रा. देवणे गल्ली, कोल्हापूर) व दरोड्यातील गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला गुंडाजी तानाजी नंदिदवाले (रा. देवणे गल्ली, कोल्हापूर ) या दोघांचा समावेश आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.
या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे खास कैद्यांकरीता तयार केलेल्या आयटीआय वसतीगृहातील कोवीड सेंटर मध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास या दोघांनी खिडकीचे गज कापून पलायन केले. दोघे पळून जाताना अन्य कैद्यांनी आरडाओरड केली.
बंदोबस्तावरील पोलीसांनीही विजेरीचा प्रकाश झोत टाकून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्या हाती लागले नाहीत. जेल पोलिसांच्या डोळ्यासमोर त्या दोघांनी धुम ठोकली. शुक्रवारी सकाळपासून जुना राजवाडा पोलिसांचे एक पथक या दोघांच्या मागावर सोडण्यात आले आहे.