पावसामुळे जिल्ह्यातील दोन मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:35 AM2020-06-20T10:35:50+5:302020-06-20T10:38:18+5:30
पावसामुळे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग आणि एक प्रमुख जिल्हा मार्ग असे दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
कोल्हापूर : पावसामुळे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग आणि एक प्रमुख जिल्हा मार्ग असे दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे-साळोखेनगर-बालिंगे-शिंगणापूर १९४ या राष्ट्रीय महामार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर एक फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
कागल तालुक्यातील बिद्री सोनाळी-सावर्डे बु. गोरंबे आनूर बस्तवडे प्रजिमा क्र.४६ मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर एक फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे. पर्यायी इजिमा क्र. १८९ अनुर ते बानगे व इजिमा क्र. ९३ बानगे मार्गे वाहतुक सुरू आहे.