त्या दोघींनी कोरोना वेशीवर रोखण्यासाठी कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:46+5:302021-07-10T04:16:46+5:30
कोपार्डे - करवीर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाने घर टू घर अँटिजन टेस्ट घेण्याची मोहीम सुरू केली ...
कोपार्डे - करवीर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाने घर टू घर अँटिजन टेस्ट घेण्याची मोहीम सुरू केली आहे, कुडित्रे व खुपिरे (ता. करवीर) येथील महिला सरपंचानी. स्वतः ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा हाती घेतली आहे व कोरोनाला वेशीवर रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कुडित्रे गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात एकाच घरातील तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने हॉटस्पॉट गावातून घर टू घर अँटिजन टेस्ट घेण्याची सक्ती केली आहे. सुरुवातीला पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीपोटी ग्रामस्थांनी या टेस्टला विरोध करण्यास सुरुवात केली, पण सरपंच ज्योत्स्ना पाटील या स्वतः लॅब असिस्टंट असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करत अँटिजन टेस्ट करण्याची मोहीम गतिमान केली आहे. एक हजाराच्यावर ग्रामस्थांची अँटिजन टेस्ट करून उद्दिष्टपूर्तीला गती दिली आ.हे खुपिरे गावात कोरोना रुग्णांचा आकडा १८० च्यावर गेला होता, तर आठ-दहा ग्रामस्थांचा बळी गेला आहे. खुपिरेच्या सरपंच दीपाली जांभळे यांनी प्रथम आपल्या कुटुंबासह प्रभागातील घर टू घर अँटिजन टेस्ट घेतल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य विभागाच्या मदतीने प्रबोधन बैठका घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही मोहीम गतिमान केली आहे.
१) कुडित्रे (ता. करवीर)च्या सरपंच स्वतः लॅब असिस्टंट असल्याने स्वतःच टेस्ट घेत आहेत, २) खुपिरे ग्रामपंचायतीचे सदस्य व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन अँटिजन टेस्ट घर टू घर सुरू केली आहे.