Kolhapur: पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:43 IST2024-07-01T14:42:17+5:302024-07-01T14:43:20+5:30
पोहता येत नसतानाही नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला

Kolhapur: पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना
गौरव सांगावकर
राधानगरी : निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी पर्यटनसाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी ) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज, सोमवार सकाळच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला गाडी चालक यांने डोहात उडी घेऊन गणेश पर्यंत पोहचला.
पण गणेशने प्रतीक याला मिट्टी मारल्याने दोघेही बुडाले. घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. पाऊस जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथला निर्माण होत आहे. अद्याप दोघांने मृतदेह हाती लागले नाहीत.